शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

७.२ किमान तपमान : राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडीची लाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 19:08 IST

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून नाशिक थंडीने गारठले आहे.

ठळक मुद्दे गुरुवारी पारा थेट ७.२ अंशांपर्यंत घसरल्याने ही नोंद हंगामातील सर्वाधिक नीचांकीनाशिककरांना पुन्हा हुडहुडी निफाड तालुका चांगलाच गारठला

नाशिक : मकर संक्रांतीपासून गायब झालेली थंडीची लाट मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पुन्हा परतली आहे. नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी ७.२ इतके किमान तपमान गुरुवारी (दि.२५) नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली. तपमानात सातत्याने होणा-या घसरणीमुळे नागरिक गारठले आहेत.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून नाशिक थंडीने गारठले आहे. हंगामात २७ डिसेंबर रोजी सर्वाधिक कमी ८.२ इतक्या किमान तपमानाची नोंद झाली होती; मात्र गुरुवारी पारा थेट ७.२ अंशांपर्यंत घसरल्याने ही नोंद हंगामातील सर्वाधिक नीचांकी ठरली. २०१६ साली नाशिकमध्ये सर्वाधिक कमी किमान तपमान ५.५ अंश इतके नोंदविले गेले होते.गेल्या वर्षी डिसेंबरच्या २७ तारखेला हंगामातील नीचांकी ८.२ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. एकूणच डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककर गारठले होते. नववर्ष उजाडल्यानंतर थंडीची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली होती. बुधवारी (दि.२४) ८.८ अंशांपर्यंत तपमान घसरले. निफाड तालुका चांगलाच गारठला असून, गुरुवारी नीचांकी ४.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. रविवारपासून किमान तपमान घसरण्यास सुरुवात झाली. पारा रविवारी व सोमवारी १०.८ अंशांवर होता. मंगळवारी पारा १२.६ अंशांपर्यंत वाढला; मात्र बुधवारी पारा थेट ८.८ अंंश आणि गुरुवारी ७.२ अंशांपर्यंत घसरला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल तपमानात अल्प वाढ झाली.

नाशिककरांना पुन्हा हुडहुडीबुधवारी संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात शहरात थंड वारे वेगाने वाहू लागल्याने किमान तपमान घसरले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून नाशिककरांना मोठ्या प्रमाणात थंडीचा सामना करावा लागत आहे. बुधवार व गुरुवारी पहाटे कमालीची थंडी जाणवल्याने शाळा-महाविद्यालयांच्या पटसंख्येवरही त्याचा परिणाम जाणवला. विद्यार्थी मात्र पूर्णपणे उबदार कपड्यांनी ‘पॅक’ होऊन शाळेसाठी घराबाहेर पडल्याचेही चित्र पहावयास मिळाले. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला किमान तपमान घसरल्यामुळे विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या तयारीवर काहीसा परिणाम जाणवला. सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांनी सकाळऐवजी दुपारी साहित्य कवायतीचा सराव केला.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र