शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

खड्डेमुक्त महाराष्टÑसाठी सात हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:58 PM

नाशिक : खड्डेमुक्त महाराष्टÑ अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्वी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, सात हजार कोटी रुपये या अभियानासाठी खर्च करण्यात येणार असल्याने राज्यातील रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरुस्तीची कामे तातडीने केली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. खड्ड्यांबरोबरच नाशिक जिल्ह्णात सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : जिल्ह्यातील ७० पुलांचीही दुरुस्ती सुरूसप्तशृंगगड येथे फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम त्वरित पूर्ण करून ती खुली करण्याच्या सूचना

नाशिक : खड्डेमुक्त महाराष्टÑ अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्वी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, सात हजार कोटी रुपये या अभियानासाठी खर्च करण्यात येणार असल्याने राज्यातील रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरुस्तीची कामे तातडीने केली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. खड्ड्यांबरोबरच नाशिक जिल्ह्णात सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने राज्य सरकारने खड्डेमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेतले राज्यात ५७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्यात येत असून, या अभियानात चांगली कामगिरी करणाºयांचे कौतुक करण्यासाठी राज्यभर दौरा केला. नाशिक हा शेवटचा जिल्हा असल्याने नाशिकच्या अधिकाºयांनीही चांगले काम केल्याचे ते म्हणाले. यावेळी पाटील यांच्या हस्ते चांगले काम करणाºया ५०हून अधिक अधिकाºयांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांनी नाशिक जिल्ह्णाचा आढावा सादर केला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक मंडळात सन २०१७च्या अर्थसंकल्पात ४४ कामे मंजूर असून, चार पुलांची कामे सुरू आहेत. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले. जेट पॅचद्वारे खड्डे भरण्यात येत असल्याने ही कामे टिकाऊ असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच राज्यात काही ठिकाणी पूल कोसळण्याच्या घटना पाहता नाशिक जिल्ह्णातील सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार जे. पी. गावित, मुख्य अभियंता एच. एस. पगारे, कार्यकारी अभियंता एस. एस. पाटील उपस्थित होते.सप्तशृंगगडावरील ट्रॉलीबाबत सूचनासप्तशृंगगड येथे फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम त्वरित पूर्ण करून ती भाविकांसाठी खुली करण्याच्या सूचनाही चंद्रकात पाटील यांनी यावेळी दिल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावरून प्रवास करीत असताना वाटेत स्वच्छतागृह नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे मान्य करून पाटील यांनी राज्यमार्गांवर विशिष्ट अंतरावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने स्वच्छतागृह बांधण्यात येणार असून, त्यासाठी सीएसआरमधून निधी मिळवून देण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीची जागा जाहिरात फलकांसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.