गटांसाठी ७०, गणांसाठी १०२ अर्ज
By Admin | Updated: February 4, 2017 23:52 IST2017-02-04T23:52:16+5:302017-02-04T23:52:37+5:30
चौथा दिवस : गटांना एकूण ६७३; गणांसाठी १११३ आॅनलाइन अर्ज

गटांसाठी ७०, गणांसाठी १०२ अर्ज
नाशिक : जिल्हा परिषद गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी (दि.४) जिल्हा परिषद गटांसाठी प्रत्यक्ष ७०, तर पंचायत समिती गणांसाठी प्रत्यक्ष १०२ अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत शशिकांत मंगरुळे यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी (दि.४) चौथ्या दिवशी ७३ गटांसाठी एकूण ७०, तर १४६ गणांसाठी एकूण १०२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी चौथ्या दिवसांपर्यंत ७३ गटांसाठी एकूण १०६, तर १४६ गणांसाठी एकूण १५० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच गटांसाठी आतापर्यंत ६७३ व गणांसाठी १११३ उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी (दि.३) तिसऱ्या दिवशी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३४ अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ४५ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी शनिवारी दाखल झालेल्या एकूण ७० अर्जामंध्ये प्रामुख्याने बागलाण - ०८, मालेगाव - १५, देवळा - ०२, कळवण - ०७, सुरगाणा - ०१, दिंडोरी - १६, चांदवड - ०७, येवला - ०६, निफाड - ११, नाशिक - ०६, त्र्यंबकेश्वर - ०१, इगतपुरी - १३, सिन्नर - ०२ असे एकूण ७० उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात आले. शनिवारी १४६ गणांसाठी १०२ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात आले. त्यात बागलाण - ०६, मालेगाव - १०, देवळा - ०१, कळवण - ७, दिंडोरी - १३, चांदवड - ०१, येवला - ०६, निफाड - ११, नाशिक - ०१, त्र्यंबकेश्वर - ०७, इगतपुरी - १७, सिन्नर - ०४ असे एकूण १०२ उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)