शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गतवर्षीच्या तुलनेत ६९ने वाढला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:48 IST

गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ‘आमची मुलगीक़ॉम’ या शासनाच्या संकेतस्थळावर केल्या जाणाºया तक्रारी व घेतली जाणारी तत्काळ दखल, गर्भलिंगनिदान करणाºया डॉक्टरांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे, न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षा, आरोग्य विभागाद्वारे केली जाणारी जनजागृती तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत यांसारख्या विविध उपक्रमांमुळे नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात ६९ने वाढ झाली आहे़ सन २०१६-१७ मध्ये दर हजार मुलांमागे जन्मास येणाºया ९१३ मुलींवरून ही संख्या आता ९८२ झाली आहे़

नाशिक : गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ‘आमची मुलगीक़ॉम’ या शासनाच्या संकेतस्थळावर केल्या जाणाºया तक्रारी व घेतली जाणारी तत्काळ दखल, गर्भलिंगनिदान करणाºया डॉक्टरांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे, न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षा, आरोग्य विभागाद्वारे केली जाणारी जनजागृती तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत यांसारख्या विविध उपक्रमांमुळे नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात ६९ने वाढ झाली आहे़ सन २०१६-१७ मध्ये दर हजार मुलांमागे जन्मास येणा-या ९१३ मुलींवरून ही संख्या आता ९८२ झाली आहे़  मुलगा व मुलगी यांच्या व्यस्त जन्मदराबाबत देशभरातून निवडण्यात आलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश झाल्याने ही चिंतेची बाब ठरली होती़ त्यामुळे गतवर्षी शासनाने स्त्रीभ्रूणहत्याविरोधी मोहीम, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांवर दाखल झालेले गुन्हे, निफाड न्यायालयाने सुमारे दोन वर्षांपूर्वी पीसीपीएनडीटी कायद्यान्वये डॉक्टरांना सुनावलेली शिक्षा या सर्वांचे एकत्रित चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत़नाशिक जिल्ह्यात सन २०१६-२०१७ मध्ये ९१३ असलेला मुलींचा जन्मदर हा २०१७-१८ मध्ये ९८२ इतका झाला आहे़ केंद्र व राज्य शासनाकडून स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, मुख्य म्हणजे, असे वर्तन करणाºया वैद्यकीय व्यावसायिकांना न्यायालयाने कठोर शिक्षादेखील सुनावली आहे़ यामुळे गर्भलिंग तपासणीसारख्या गैरप्रकाराला चांगलाच आळा बसला आहे़ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून, यासाठी आरोग्य, महसूल व पोलीस विभाग यांच्यातील समन्वयही तितकाच प्रभावी ठरला आहे़गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्मदरामध्ये ६९ने वाढ झाली असून, सेक्स रेशो दर हजार मुलांमागे ९८२ इतका झाला आहे़ शासनाच्या वेबसाइटवर गर्भलिंग तपासणी करणाºया डॉक्टरांविरुद्धच्या तक्रारी, पोलिसांत दाखल होणारे गुन्हे, न्यायालयाकडून होणारी शिक्षा यामुळे गर्भलिंग तपासणीसारख्या गैरप्रकाराला वचक बसला आहे़ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्यामुळे हे शक्य झाले आहे़ तसेच जिल्ह्यात आणि शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बेटीबचाव अभियान राबविण्यात येत आहे.- डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक