येवला तालुक्यात पावसाने ६७ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:01+5:302021-06-01T04:12:01+5:30
येवला : शहरासह तालुक्यात शनिवारी (दि.२९) झालेल्या पावसाने १४ गावांमधील सत्तर व्यक्तींचे ६७ लाख १७ हजार ४८० रुपयांचे ...

येवला तालुक्यात पावसाने ६७ लाखांचे नुकसान
येवला : शहरासह तालुक्यात शनिवारी (दि.२९) झालेल्या पावसाने १४ गावांमधील सत्तर व्यक्तींचे ६७ लाख १७ हजार ४८० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार प्रमोद हिले यांनी दिली. दरम्यान, रविवारीदेखील सलग चौथ्या दिवशी वादळी पावसाने तालुक्याच्या काही भागांत हजेरी लावली.
शनिवारी दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने शहरासह तालुक्यातील राजापूर, नगरसूल, अंदरसूल, लौकी शिरस, वाईबोथी, साताळी, धामोडे, नांदूर, बाभूळगाव बुद्रुक, कोळम खुर्द, अनकुटे, सावरगाव, नागडे, मातुलठाण या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वीज पडल्याने घरांचे, चाऱ्यांचे नुकसान झाले असून, एक बैलदेखील मृत्युमुखी पडला होता. अनेक गावांमध्ये झाडे पडल्याने घरांचे पत्रे उडाल्याने कांदा चाळ, कांदा शेड, पोल्ट्री शेड यासह एका फोटो स्टुडिओचेदेखील नुकसान झाले होते.
महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले आहेत. दरम्यान, रविवारी, (दि. ३१) सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने शहरासह तालुक्यातील काही भागांत हजेरी लावली.