६६४ उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: April 4, 2016 00:20 IST2016-04-03T23:04:54+5:302016-04-04T00:20:17+5:30
६६४ उमेदवारी अर्ज दाखल

६६४ उमेदवारी अर्ज दाखल
पेठ : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उत्साहपेठ : तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ३६ ग्रामपंचायतींच्या २९६ जागांसाठी ६६४ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असून, त्यापैकी सावळघाट, मांगोणे, म्हसगण, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या काही प्रभागात दुरंगी व तिरंगी सामन्याचे चित्र पाहावयास मिळत असले तरीही छाननी व माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या जागांसाठी तितक्याच उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असल्याने त्या बिनविरोध बिनविरोध होण्याचे संकेत आहे.
गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे-
कुंभारबारी- ७ जागांसाठी १६ नामनिर्देशपत्र, भुवन- ९ जागांसाठी १९, आडगाव भु.- ९ जागांसाठी १६, धोंडमाळ- ११ जागांसाठी २ , शिवशेत- ७ जागांसाठी १९, सावळघाट- ७ जागांसाठी ८, जांबविहीर- ७ जागांसाठी १४, कायरे- ९ जागांसाठी १६, कुंभाळे- ९ जागांसाठी २६, वांगणी- ७ जागांसाठी २१, करंजाळी- ९ जागांसाठी २५, कोहोर- ११ जागांसाठी ३३, कोपुर्ली खुर्द- ७ जागांसाठी २३, मांगोणे- ७ जागांसाठी ७, पाटे- ९ जागांसाठी २४, कापुर्णे- ९ जागांसाठी १२, म्हसगण- ९ जागांसाठी ९, डोल्हारमाळ- ७ जागांसाठी ११, राजबारी- ९ जागांसाठी १६, खोकरतळे- ७ जागांसाठी २, आड बुद्रूक- ७ जागांसाठी १६, कोटंबी क.- ७ जागांसाठी १५, कोपुर्ली बुदू्रक- ९ जागांसाठी २२, उंबरपाडा क.- ७ जागांसाठी १८, कळमबारी- ७ जागांसाठी १५, करंजखेड- ९ जागांसाठी २०, भायगाव- ७ जागांसाठी १६, देवगाव- ७ जागांसाठी १६, गोंदे- ७ जागांसाठी ८, आंबे- ९ जागांसाठी २०, पाहुचीबारी- ९ जागांसाठी १७, जोगमोडी- ९ जागांसाठी २४, बोरवट- ७ जागांसाठी १९, माळेगाव- ९ जागांसाठी २७ असे नामनिर्देशपत्र दाखल झाले असून, त्यापैकी छाननी व माघारीनंतर म्हसगण, सावळघाट, मांगोणे, गोंदे या ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याचे बोबले जात आहे. ग्रामसेवकांनी दिलेल्या शौचालय वापर दाखल्यावरील होय/नाही यापैकी कोणत्याही पर्यायावर काट न मारल्याने अनेक उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली असल्याचे चित्र आहे.
(वार्ताहर )
ंदुष्काळामुळे द्राक्षबागा संकटात
निफाड : तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे तालुक्यातील डाळींब व द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून, बागा कशा जगवाव्यात हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
यंदा सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडल्याने बागांना पाणी नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांना व पशुधनास कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. काही भांडवलदार शेतकऱ्यांचा १००/१५० किमी अंतरावरून टॅँकरने पाणी आणून बागा जगविण्याचा आटापिटा सुरू आहे. (प्रतिनिधी)