निमा निवडणुकीसाठी ६६ अर्ज दाखल
By Admin | Updated: July 14, 2016 01:09 IST2016-07-14T01:05:08+5:302016-07-14T01:09:26+5:30
निमा निवडणुकीसाठी ६६ अर्ज दाखल

निमा निवडणुकीसाठी ६६ अर्ज दाखल
अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी शून्य प्रतिसादसातपूर : निमा पदाधिकाऱ्यांच्या द्वीवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४१ जागांसाठी ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर मोठ्या उद्योगासाठी राखीव असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांसाठी कोणीही उमेदवारी दाखल केलेली नाही.
निमा पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या ४१ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ६६ उमेदवारी अर्जांची विक्र ी झाली होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २२ जुलैला माघारीचा शेवटचा दिवस आहे. आवश्यकता वाटल्यास २९ जुलैला मतदान आणि ३० जुलैला मतमोजणी व ३१ जुलैला वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकृत निकाल घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतानी, तर सहायक म्हणून विवेक गोगटे आणि जे. एम. पवार काम पाहत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. साडेपाच वाजेपर्यंत फक्त बारा अर्ज दाखल झाले होते. पावणेसहा वाजेनंतर उमेदवारांनी एकदम अर्ज दाखल करण्यास सुरु वात केल्याने निवडणूक सचिवांचा गोंधळ उडाला होता. कारण अर्ज दाखल करून अनामत रकमेची पावती उमेदवाराला द्यावी लागत होती. (वार्ताहर)