वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील पिंपळदमधून पुण्यात गुटखा तस्करी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ट्रकसह ६६ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अहमदाबादमधील पिंपळद येथील बटको ट्रान्सपोर्टमधुन सफेद रंगाच्या गोण्यामधे आरएमडी गुटख्याचे १२० मोठे बॉक्स व टोबॅको मिक्स तंबाखुचे ६० बॉक्स असे ४८ लाख ९६ हजार , ७ लाख ३२ हजार ७९० रुपयांचा परच्युटन माल तसेच १० लाख रुपयांचा ट्रक असा एकुण ६६ लाख २८ हजार ७९० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मंगेश गोरखनाथ वर्हाडी (४८,राहणार पिंपळगाव तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे) या संशयितास अटक करण्यात आली. आहे. गुजरातमधुन महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होते . गुजरात राज्याची हद्द वणीपासुन सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. गुजरातमधून सापुतारा वणी असा सुरक्षित मार्ग तस्करांना महाराष्ट्रात येण्यासाठी आहेत. याच मार्गाना अग्रक्रम तस्करांकडुन देण्यात येतो. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा सहजगत्या बोरगाव तपासणी नाका वणी सापुतारा रस्त्यावरील चौफुली येथुन वाहतुक करणे एवढे सोपे नाही. गुटखा वाहतुक करणारा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हा गुटखा कोठुन आणतो याची पाळेमुळे शोधुन काढणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षिक के के पाटील यांनी दिल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे.
पान १ट्रकसह ६६ लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:15 IST
वणी : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील पिंपळदमधून पुण्यात गुटखा तस्करी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ट्रकसह ६६ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पान १ट्रकसह ६६ लाखांचा ऐवज जप्त
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : गुटखा तस्करी प्रकरणी एकास अटक