शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गोदाघाट स्वच्छतेसाठी ६५ सफाई कामगार

By admin | Published: June 22, 2017 12:05 AM

नाशिक : महापालिकेने गोदावरी नदी संवर्धनांतर्गत सुरक्षा आणि स्वच्छता या दोन स्तरांवर काम करण्याचा निर्णय घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने गोदावरी नदी संवर्धनांतर्गत सुरक्षा आणि स्वच्छता या दोन स्तरांवर काम करण्याचा निर्णय घेतला असून, गोदाघाटाच्या स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाने आयुक्तांच्या आदेशान्वये ६५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दोन सत्रात गोदाघाट परिसराची स्वच्छता होणार आहे.  महापालिकेने गोदावरी नदीपात्राबरोबरच आता गोदाघाट परिसराच्याही स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाने नियोजन केले असून, घाट परिसराच्या स्वच्छतेसाठी ६५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे आदेशही संबंधित कर्मचाऱ्यांना काढले असून, बुधवारी (दि.२१) ४७ कर्मचारी कामावर रुजूही झाले आहेत. सदर सफाई कर्मचाऱ्यांमार्फत होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत दोन पाळ्यांमध्ये सफाईची कामे करून घेतली जाणार आहेत. गोदावरी नदीच्या दोन्ही तीरावरील पन्नास मीटरपर्यंतच्या परिसराच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. याशिवाय, ४ मुकादम आणि ४ स्वच्छता निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.  सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करून दिले जाणार आहे. दोन पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त केल्याने घाट परिसरात कायमस्वरूपी स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे. तसेच गोदाघाटावर कायमस्वरूपी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबतही गोदावरी संवर्धन कक्षाने आरोग्य विभागाला कळविले आहे. त्यामुळे, घाटावरील ब्लॅकस्पॉटवरील कचरा तातडीने उचलणे सोपे जाणार आहे. स्वच्छतेबरोबरच महापालिकेने नदीपात्रात घाण-कचरा टाकू नये यासाठी सद्यस्थितीत ५० सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. आतापर्यंत २८ जणांवर घाण-कचरा टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. कक्षाने आणखी ५० सुरक्षारक्षकांची मागणी केली असून, जिल्हा सुरक्षा मंडळाकडून सुरक्षारक्षक प्राप्त झाल्यानंतर किमान दोन फिरती पथकेही तैनात केली जाणार आहेत. या पथकांसोबत महापालिकेचाही एक कर्मचारी नियुक्त केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.