जिल्'ात स्वाइन फ्लूचे ६४ रुग्ण
By Admin | Updated: March 6, 2015 00:26 IST2015-03-06T00:24:45+5:302015-03-06T00:26:27+5:30
जिल्'ात स्वाइन फ्लूचे ६४ रुग्ण

जिल्'ात स्वाइन फ्लूचे ६४ रुग्ण
नाशिक : सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्'ाची, तर महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वाइन फ्लूसदृश रुग्णांबाबत दररोज अहवाल मागविण्यात येत असून, त्यानुसार काल (दि.५) जिल्'ात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने कळविली आहे. आतापर्यंत जिल्'ात स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या त्यामुळे ६४ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे चार संशयितांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील तीन रुग्ण हे ग्रामीण भागातील तर एक रुग्ण शहरी भागातील विनयनगर परिसरातील आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पाच आढळलेल्या स्वाइन फ्लू रुग्णांमध्ये एक तीन नाशिक, तर दोन ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. यासंदर्भात २७ फेब्रुवारीलाच राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हा परिषदांना विशेष पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दररोज सायंकाळी ४ वाजेच्या आत आरोग्य विभागाच्या यंत्रणेला जिल्'ात आढळलेल्या स्वाइन फ्लू रुग्णांसंदर्भात आवश्यक ती माहिती कळविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खोकला येणे, सर्दी-पडसे होणे, घसा दुखणे व ताप येणे या चार प्रमुख लक्षणांची लागण झाल्याचे आढळल्यास कोणत्याही निदानाची वाट न पाहता अशी लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांवर आॅसेलटॅमीवीर पद्धतीचे उपचार सुरू करण्याच्या सूचनाही या पत्रानुसार निर्गमित करण्यात आल्या आहेत. काल आढळलेल्या पाच स्वाइन फ्लू रुग्णांमध्ये तीन शहरांतील, तर दोन ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)