दिंडोरी तालुक्यात ६३८ ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 07:10 PM2021-04-10T19:10:07+5:302021-04-10T19:10:44+5:30

दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवत नागरिकांनीही घरीच राहणे पसंत करून वीकेंडच्या कडकडीत बंदला स्वयंस्फूर्तीने साथ दिली आहे.

638 active patients in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात ६३८ ॲक्टिव्ह रुग्ण

दिंडोरी शहरातील नाशिक कळवण रोडवर शुकशुकाट.

Next
ठळक मुद्देवीकेंड कडक निर्बंधाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवत नागरिकांनीही घरीच राहणे पसंत करून वीकेंडच्या कडकडीत बंदला स्वयंस्फूर्तीने साथ दिली आहे.

शहरात दवाखाने व मेडिकल सुरू होते. इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने नागरिकांची वर्दळही थांबली होती. पोलिसांकडून पालखेड चौफुलीवर चेकपोस्ट करत येणाऱ्या-जाणाऱ्यांची विचारपूस केली जात असून सध्या शेतमालाची किरकोळ वाहतूक सुरू होती. नागरिकांनीही या कडकडीत बंदला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले.
मोहाडी ग्रामस्थांनी बैठक घेत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला असून, गाव कोविडमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

दरम्यान, दिंडोरी तालुक्यात ६३८ रुग्ण हॉटस्पॉट बनलेल्या मातेरेवाडीत परिस्थिती नियंत्रणात आहे, तर वणी व खेडगावमध्ये रुग्ण वाढले आहेत.
तालुक्यात ६३८ रुग्ण ॲक्टिव्ह असून हॉटस्पॉट बनलेल्या मातेरेवाडी येथील रुग्ण संख्या घटली आहे. आता २६ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर सर्वाधिक रुग्ण वणीत ७८, दिंडोरीत ६९, खेडगाव ५५, उमराळे बु ३०, मोहाडी २६, चिंचखेड २५, सोंनजांब २३, लाखमापूर २३ असे विविध गावांत रुग्ण असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावित गावात व परिसरात सर्वेक्षण तपासण्या सुरू आहेत.

नागरिकांनी काळजी घेत नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी केले आहे.


 

Web Title: 638 active patients in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.