सटाणा तालुक्यात ६२.७० टक्के मतदान

By Admin | Updated: February 22, 2017 01:47 IST2017-02-22T01:47:26+5:302017-02-22T01:47:39+5:30

निवडणूक : ५८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रात बंद

62.70 percent voting in Satana taluka | सटाणा तालुक्यात ६२.७० टक्के मतदान

सटाणा तालुक्यात ६२.७० टक्के मतदान

सटाणा : जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बागलाण तालुक्यात ६२.७० टक्के मतदान काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. जिल्हापरिषदेच्या सात जागांसाठी सत्तावीस उमेदवारांचे व पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी ५८ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे.  बागलाण तालुक्यात आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळ पासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या दुपारी बारा वाजे पर्यंत तालुक्यात बावीस टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी दीड वाजे नंतर पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली होती.दुपारी साडे तीन वाजे पर्यंत ४७.३० टक्के मतदान झाले. नामपूर व जायखेडा गटात बहुतांश ठिकाणी मतदार याद्यांचा घोळ झाल्यामुळे बहुतांश मतदारांना आपल्या हक्का पासून वंचित राहावे लागले.  लखमापूर येथील रात्री सव्वा आठ वाजे पर्यंत मतदान प्रक्रि या सुरु होती. पठावेदिगर गटात सर्वाधिक ७३.१४ टक्के मतदान झाले. ३०३९४ मतदारांपैकी २२२३१ मतदारांनी आपला हक्का बजावला.ताहाराबाद गटात ३१८३८ मतदारांपैकी १६६७१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून ५२.३६ टक्के मतदान झाले. जायखेडा गटात एकूण ३५२६५ मतदारांपैकी २४४७९ मतदारांनी हक्क बजावला. तेथे ६९.४१ टक्के मतदान झाले. नामपूर गटात ५५.४४ टक्के इतके मतदान झाले.एकूण ३४५८४ पैकी १९१७४ मतदारांनी आपला हक्क बजावला.वीरगाव गटात ५८.८७ टक्के मतदान झाले असून एकूण ३३८३१ पैकी १९९१८ मतदारांनी आपला हक्क बजावला ,ठेंगोडा गटात ६१.५३ टक्के मतदान झाले. एकूण ३४२०० पैकी २१०४३ मतदारांनी मतदान केले. ब्राम्हणगाव गटात ६८.५८ टक्के मतदान झाले. एकूण ३३२४१ पैकी २२७९७ मतदारांनी मतदान केले. मतदानासाठी पोलीस निरीक्षक बशीर शेख ,विजय ठाकूरवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर ,गणेश गुरव ,कृष्णा घायवट आदी अधिकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पिंपळकोठे येथे दुपारी दोन वाजेच्या दरम्यान काही नागरिकांनी तळवाडे भामेर पोच कालव्याला विना परवानगी पाणी सोडलेले पाणी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी बंद केले. त्याचा निषेध म्हणून आज दुपारी अचानक एका जमावाने मतदानावर बिहष्कार टाकला म्हणून नागरिकांना मतदान करण्यास एक प्रकारे मज्जाव केला. मात्र सतर्क पोलीस यंत्रणेमुळे मतदान प्रक्रि या सुरळीत झाली होती.  माजी आमदार संजय चव्हाण यांनी संबधित नागरिकांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र तरूण शेतकरी ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे चव्हाण यांना माघारी परतावे लागले. (वार्ताहर)

Web Title: 62.70 percent voting in Satana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.