शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के बलात्कार विवाहाच्या आमिषापोटी

By विजय मोरे | Updated: December 17, 2018 00:29 IST

विवाहाबाबत प्रत्येक तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाइलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तीबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडिया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून विवाहाचे आमिष दाखवित बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या आमिषाने झाल्याचे समोर आले आहे़

ठळक मुद्देधक्कादायक : सोशल मीडियाद्वारे ओळख; चालू वर्षी सर्वाधिक गुन्हे

नाशिक : विवाहाबाबत प्रत्येक तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाइलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तीबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडिया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून विवाहाचे आमिष दाखवित बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या आमिषाने झाल्याचे समोर आले आहे़शहर पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाणी व सायबर पोलीस ठाण्यात जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत बलात्काराचे ४२ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ४० गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे़ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांपैकी सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे विवाहाचे आमिष दाखवून केल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरून समोर आले आहे़ विवाहाच्या आमिषास केवळ अविवाहित तरुणीच नव्हे, तर विवाहित महिला व अल्पवयीन शाळकरी मुलीही बळी पडल्या असून, त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत़नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत तीन वर्षांत १०८ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत़ या गुन्ह्यांतील कारणांचा आढावा घेतला असता नातेसंबंध, ओळखीतील तरुण तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम व विवाह जमविणारी संकेतस्थळे यावरून ओळख वाढवून प्रथमत: विश्वास निर्माण केला जातो़ यानंतर विवाहाचे आमिषाने तरुणींना भावनिक करून त्या नावाखाली बलात्कार केला जातो़ यावर कळस म्हणजे प्रेमसंबंधातून झालेल्या शरीर-संबंधांचे गुपचूप व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकून खंडणी उकळल्याचे प्रकारही घडले आहेत़२मुळात ‘विवाह’ हे व्यक्तींमधील नातेसंबंध (नाते) निर्माण करणारे सामाजिक बंधन अथवा कायदेशीर करार असतो़ मात्र, सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगात वावरणारी तरुणाई विशेषत: तरुणी याकडे दुर्लक्ष करतात़ काही महिन्यांपूर्वीच ओळख झालेल्या व्यक्तीने दिलेल्या विवाहाच्या आमिषास भुलून आपले सर्वस्व बहाल करतात़ यानंतर काही दिवसांनी संबंधित अनोळखी तरुणाचा पूर्वीच विवाह झाल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे समोर येते़ पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांमध्ये गतिमंद, अल्पवयीन व शाळकरी मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटनांची संख्याही तुलनेने अधिक आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी