मालेगाव उपविभागातील ६० वन कर्मचारी संपात

By Admin | Updated: September 4, 2014 00:03 IST2014-09-04T00:00:58+5:302014-09-04T00:03:51+5:30

मालेगाव उपविभागातील ६० वन कर्मचारी संपात

60 One worker strike in Malegaon subdivision | मालेगाव उपविभागातील ६० वन कर्मचारी संपात

मालेगाव उपविभागातील ६० वन कर्मचारी संपात


मालेगाव : मालेगाव उपविभागातील वनविकास कार्यालयातील सुमारे ६० कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाल्याने वनविभागाच्या कामांवर परिणाम होत आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी उपाययोजना केली आहे. मालेगाव उपविभागात मालेगाव आणि बागलाण तालुक्यात असलेल्या वनविभागात ६० कर्मचारी सेवेत आहेत. त्यात ४५ वनरक्षक आणि १५ वनपाल यांचा समावेश आहे. गेल्या २५ आॅगस्टपासून वनकर्मचारी संपावर गेले आहेत. आता वनकर्मचाऱ्यांचा संप कधी मिटेल याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

Web Title: 60 One worker strike in Malegaon subdivision