पंचवटीत ६० लाखांची रोकड जप्त
By Admin | Updated: September 25, 2015 23:54 IST2015-09-25T23:54:19+5:302015-09-25T23:54:59+5:30
पंचवटीत ६० लाखांची रोकड जप्त

पंचवटीत ६० लाखांची रोकड जप्त
पंचवटी : पंचवटी कारंजा परिसरातून हवाल्याची रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ६० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुन्हे शोध शाखा व सहायक पोलीस आयुक्तांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी पहिल्यांदाच एवढी रोकड हस्तगत केल्याने पंचवटीतील हवाला रॅकेट पुन्हा चर्चेत आले आहे.
एका बांधकाम व्यावसायिकाला ६० लाख रुपयांची रोकड हवालाच्या माध्यमातून चारचाकीतून नेली जात असल्याबाबतची माहिती गुन्हे शाखा व सहायक पोलीस आयुक्तांच्या पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी पंचवटी कारंजा परिसरात सापळा रचला. पोलिसांनी चारचाकी अडवून झडती घेतली असता त्यात एका बॅगेत ६० लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी त्या कारसह गाडीतील दोघांनाही ताब्यात घेत कसून चौकशी केली. सदरची रक्कम ही येवला तसेच गुजरात येथील बांधकाम व्यावसायिकाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अशोककुमार अमृतलाल पटेल व सलमान हसन शेख अशा दोघांना ताब्यात घेतले होते. (वार्ताहर)