लासलगांवमधील ६ दुकाने सिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 18:52 IST2021-04-20T18:51:41+5:302021-04-20T18:52:41+5:30
लासलगाव : जनता कर्फ्यु असतांना नियमांचे उल्लघन करतांना आढळुन आलेल्या व्यवसायकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळेस लासलगांवमधील ६ दुकाने ...

लासलगाव येथे दुकाने सिल करून दंडाची कारवाई करतांना लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी.
लासलगाव : जनता कर्फ्यु असतांना नियमांचे उल्लघन करतांना आढळुन आलेल्या व्यवसायकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळेस लासलगांवमधील ६ दुकाने सिल करण्यात येवुन एकुण ६२०० रुपये दंड आकारणी करुन कार्यवाही करण्यात आली.
मंगळवारी (दि.२०) गांव समितीने बंद केलेल्या नियमांचे उल्लघन करतांना आढळुन आलेल्या व्यवसायकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी गावात फिरुन सुरु असलेले विनापरवानगी व्यवसायांवर धाड सत्र सुरु करत कार्यवाही केलेली आहे.
रुग्ण पॉझिटीव्ह आल्याची माहीती मिळाल्यानंतर परिसरामध्ये सॅनिटाझर करण्यात येते. तसेच गावी विलगीकरण कक्ष महावीर विद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेले आहे. तसेच गावठाण परिसरामध्ये ९ कंटेन्मेट झोन व नवीन एनए वसाहतीमध्ये रुग्णाच्या घराला प्रतिबंधीत क्षेत्राचे फलक लावण्यात आलेली आहेत.
सदरचे फलक जर परस्पर काढुन घेतले तर त्याबाबत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याची माहीती देण्यासाठी लेखी नोटीसही देण्यात आल्याची माहीती पाटील यांनी दिली.