शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत १८८ विनयभंग, ५२ बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:38 IST

‘महिला हिंसाचाराला माझा नकार’ असा जागर केला जात असला तरी शहरात महिला हिंसाचाराच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. मागील काही महिन्यांपासून ‘निर्भया’ पथक शहराच्या रस्त्यांवर गस्त घालत आहे.

नाशिक : ‘महिला हिंसाचाराला माझा नकार’ असा जागर केला जात असला तरी शहरात महिला हिंसाचाराच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. मागील काही महिन्यांपासून ‘निर्भया’ पथक शहराच्या रस्त्यांवर गस्त घालत आहे. यामुळे काही टवाळखोर, रोडरोमियोंना चाप बसला असला तरी ११ महिन्यांत विनयभंगाच्या तब्बल १८८ आणि बलात्काराच्या ५२ घटना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या आहेत. यावरून शहरात महिला अत्याचाराचे स्वरूप सहज लक्षात येते.कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक पुण्यनगरीत महिला अत्याचाराचे पाप दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पोलीस आयुक्तालयांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘निर्भया’ पथकासह विविध उपक्रम हाती घेतले आहे.शहरातील महिलांची वर्दळ असलेल्या ‘हॉट स्पॉट’ची निवड करून त्या ठिकाणांवर साध्या वेशात अन् वाहनात महिला, पुरुष पोलिसांचे पथक ‘वॉच’ ठेवून आहे. या निर्भया पथकाकडून गर्दीच्या ठिकाणी टवाळ्या करणाºया टवाळखोरांवर कारवाईदेखील होत आहे; मात्र महिलांचे विनयभंग व बलात्काराच्या घटनांची आकडेवारी बघता मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येते.विनयभंग, बलात्कारासारख्या घटनांमध्ये बहुतांशवेळा संशयित आरोपी हे पीडितेच्याओळखीचे असल्याचे तपासात पुढे आले आहे.१७५ गुन्ह्यांची उकलयावर्षी घडलेल्या विनयभंगाच्या १८८ गुन्ह्यांपैकी १७५ गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षी १६९ गुन्ह्यांमधील संशयितांचा शोध पोलिसांनी घेतला होता. मागील वर्षी व चालू वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात ५२ बलात्काराच्या घटना घडल्या, तर या पंधरवड्यात दोन अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार झाल्याची नोंद झाली. मागील ५२ गुन्ह्यांमधील संशयित अद्याप निष्पन्न होऊ शकलेले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी