शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:05 IST

गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता

ठळक मुद्दे२३७ टॅँकरने पाणी पुरवठा : जळगावला सर्वाधिक दाह

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्यानंतर सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून विहीरींनी तळ गाठण्याबरोबरच पाण्याचे स्त्रोत देखील आटल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, नाशिक विभागात ३० तालुक्यातील सुमारे सव्वा सहा लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ बसली असून, त्यांना २३७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाण्याची टंचाई जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली असून, त्यानंतर नाशिक व नगर जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने टॅँकरची संख्या वाढली आहे.गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. शासनाने जलयुक्त शिवार योजनेमुळे जमिनीच्या पाण्याची पातळी उंचावल्याची आकडेवारी जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात काही ठराविक भागातच पाण्याची पातळी वाढली तर काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नाशिक विभागातील ५२ तालुक्यापैकी ३० तालुक्यांना यंदा जानेवारी-फेबु्रवारीपासूनच पाणी टंचाई भासू लागल्याने अगोदर शासकीय टॅँकरने त्यांची तहान भागवावी लागली त्यानंतर खासगी टॅँकर सुरू करण्यात आले. विभागात सर्वाधिक पाणी टंचाईची झळ जळगाव जिल्ह्याला बसली असून, धामणगाव, यावल, रावेर व चोपडा हे चार तालुके वगळता ११ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील १२६ गावांना १०२ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यातही राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदार संघात सर्वाधिक ३४ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यातील चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड हे तालुके वगळता अन्य अकरा तालुक्यातील ९६ गावे १३५ वाड्यांना ६७ टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी या तालुक्यातील २ गावांना २ टॅँकर तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, शिरपूर वगळता अन्य तीन तालुक्यातील १८ गावांना १५ टॅँकर सुरू आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक