६० वर्षांवरील ६ लाख ज्येष्ठांनी घेतला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:56+5:302021-09-06T04:17:56+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला दिवसेंदिवस गती प्राप्त होत असल्याने लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या २७ लाखांच्या ...

६० वर्षांवरील ६ लाख ज्येष्ठांनी घेतला डोस
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला दिवसेंदिवस गती प्राप्त होत असल्याने लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या २७ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये ६ लाख ५९६ ज्येष्ठांना लसीचे संरक्षण मिळाले आहे, तर तरुणांची संख्या दुप्पट आहे. १२ लाख ३३ हजार तरुणांनी लसीकरण मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लसींचे डोस प्राप्त होत असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढत असल्याचे दिसून येते.
दुसऱ्या लाटेचा भयावह अनुभव आलेल्या नाशिककरांमध्ये लसीकरणाविषयीची जागरूकता आली असल्याने लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग, तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे. त्याचा परिणाम लसीकरणाची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाच कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट आढळत असल्यामुळेदेखील नागरिकांमध्ये सतर्कता निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळेदेखील नागरिकांकडून अधिक दक्षता घेतली जात असल्याचेही दिसते.
जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गर्दी फारशी नव्हती. याशिवाय नागरिकांमध्येदेखील द्विधा मन:स्थिती होती. मात्र, त्यामध्ये हळूहळू गती येत गेली आणि आता त्यात मोठी वाढ झाली असून, जिल्ह्यातील लसीकरणाचा आकडा २७ लाख १३ हजार ५४२ इतका पोहोचला आहे.
-इन्फो--
एकूण लसीकरण
२७,१३,५४२
पहिला डोस : २०,०५,३३५
दुसरा डोस : ७,०८,२०७
--इन्फो--
वयानुसार लसीकरण
१८ ते ४४ : १२,३३,०८८
४५ ते ६० : ८,७९,८५६
६० वर्षांवरील पुढे : ६,००५६९
---इन्फो--
पुरुष : १४,९२,३३७
स्त्री : १२,२०,८२४