6 acres of pomegranate garden in danger! | ७५० एकरवरील डाळींब बागा धोक्यात !
७५० एकरवरील डाळींब बागा धोक्यात !

ठळक मुद्देलाखोंचा फटका, अवकाळीचा झटका : येवला तालुक्यातील शेतकरी हवालदिल

पाटोदा (गोरख घुसळे ) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांमागे लागलेली संकटांची मालिका सुरूच आहे. आक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या थैमानाने पाटोदा परिसरातील सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा बाधित झाल्याने धोक्यात आल्या आहे. त्यामुळे डाळिंब बागांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाला असून शासनाने भरीव मदत करावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे.
येवला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकाकडे वळल्याने डाळिंब व द्राक्ष बागांच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. पाटोदा कृषी मंडळात सुमारे साडेसातशे एकर डाळिंब बागा आहेत. मात्र परतीच्या पावसाने डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. बहार धरलेल्या डाळिंब बागांची मोठया प्रमाणात फुलगळ, फळगळ, फळकुज व फळ तडकण्याच्या समस्येत वाढ झालेली आहे. तर सेटिंग झालेल्या बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या तर दुपारी ऊन आणि पहाटे थंडी व धुके अशा लहरी हवामानामुळे डाळिंबावर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्यामुळे बागा जगविण्यासाठी सकाळ संध्याकाळ महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

Web Title:  6 acres of pomegranate garden in danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.