शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

५७०० प्रवाशांनी केला बस प्रवास; आदिवासी भागात प्रतिसाद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:13 IST

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यात कंटेन्मेंट झोन वगळून सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बसेसने सुमारे ५७२८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्यांना दिलासा देण्यासाठी सुरू झालेल्या बसेस अजूनही दोन-चार प्रवासी असले तरी त्यांना इच्छितस्थळी पोहोचवत आहे.

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यात कंटेन्मेंट झोन वगळून सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बसेसने सुमारे ५७२८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्यांना दिलासा देण्यासाठी सुरू झालेल्या बसेस अजूनही दोन-चार प्रवासी असले तरी त्यांना इच्छितस्थळी पोहोचवत आहे.परप्रांतीय प्रवासी आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्यात आल्या होत्या. परराज्यातील सीमा आणि रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना सोडण्याठी विशेष बाब म्हणून या बसेस धावल्या होत्या.जिल्ह्यातील नागरिकांसाठी देखील जिल्हांतर्गत बसेस सुरू करण्याची मागणी होऊ लागल्याने शासनाच्या आदेशानुसार गेल्या २२ मेपासून जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील दहा आगारांमधून जिल्हा अंतर्गत बससेवेला सुुरुवात झाली.गेल्या २२ मे ते ९ जून या कालावधीत महामंडळाच्या बसेसने ४५३ फेऱ्या करून ५७२६ प्रवाशाांची वाहतूक केली. या माध्यमातून महामंडळाला १ लाख १६ हजार इतकेच उत्पन्न मिळाले आहे. परंतु उत्पन्न मिळविणे हा उद्देश नसून शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रवाशांना सेवा देण्यासाठी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तिसºया टप्प्यातील लॉकडाऊननंतर आता प्रवाशांची संख्यादेखील वाढू लागलेली आहे.राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना संसर्ग होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर तसेच संपूर्ण बस सॅनिटाइझ करून सोडली जात आहे.------------------------अजूनही प्रवाशांची प्रतीक्षागेल्या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्हांतर्गत दहा आगारांमधून बससेवासुरू झाली असून, आणखी काही ठिकाणाहून बस सुरू होणार आहेत. बसेस सुरू झाल्या असल्या तरी कोरानाच्या प्रभावामुळे तसेच नागरिक घराबाहेर पडत नसल्याने बसेसेला प्रवासीदेखील मिळाले नाही. पहिल्या दिवशी तर अगदीएक आणि दोन प्रवाशांना घेऊन बसेस धावल्या. सुरगाणा,पेठ मार्गावर मात्र बसेसेला मिळणारा प्रतिसाद आजही कायम आहे. इतरत्र मात्र अजूनहीअपेक्षित प्रवासी मिळत नसले तरी बसेस मात्र कायम आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक