शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

५७ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; बनावट चावीचा वापर

By admin | Published: March 09, 2017 8:51 PM

बजरंगवाडी परिसरातील सताजी नगरमध्ये राहणारे ख्वाजा लाल शेख यांच्या बंद घराचे कुलुप बनावट चावीचा वापर करुन चोरट्यांनी उघडले.

नाशिक : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून बुधवारी (दि.८) शहरात मुंबईनाका व सरकारवाडा पोलीस ठाण्यांच्या प्रत्येकी एक घर चोरट्यांनी फोडून सोने-चांदीचे दागिने लुटल्याचे उघडकीस आले आहे.उन्हाळी सुटी सुरू होण्याआगोदरच बंद घरांवर चोरट्यांकडून वक्रदृष्टी करण्यात आली असून घरफोड्या करणाऱ्या टोळ्या शहरात सक्रीय झाल्याच्या विविध घटनांवरून स्पष्ट होत आहे. सातत्याने इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, गंगापूररोड आदि परिसरात घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बजरंगवाडी परिसरातील सताजी नगरमध्ये राहणारे ख्वाजा लाल शेख यांच्या बंद घराचे कुलुप बनावट चावीचा वापर करुन चोरट्यांनी उघडले. त्यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करुन १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, तीस हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी एक तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, तीस ग्रॅम वजनाचे कानातले आभुषणे, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, पाच ग्रॅम वजनाचे पाच हजार रुपये किमतीचे आभुषणे असा एकूण ५७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करीत आहेत.