आॅलआउटमध्ये ५७ गुन्हेगारांची तपासणी
By Admin | Updated: April 4, 2016 23:56 IST2016-04-04T23:53:56+5:302016-04-04T23:56:53+5:30
आॅलआउटमध्ये ५७ गुन्हेगारांची तपासणी

आॅलआउटमध्ये ५७ गुन्हेगारांची तपासणी
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आॅपरेशन आॅलआउट राबविण्यात आले़ यावेळी यादीवरील १०९ गुन्हेगारांपैकी ५७ गुन्हेगार घरी आढळून आले़ त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे़ शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबईनाका, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीतील झोपडपट्ट्या तसेच टवाळखोरांचा वावर असलेल्या ठिकाणी आॅपरेशन आॅलआॅउट राबविण्यात आले़ यामध्ये यादीवरील गुन्हेगार, हॉटेल्स, धाबे, लॉज यांची तपासणी करण्यात आली़ ही मोहिम पोलीस उपआयुक्त एऩअंबिका, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली़ या आॅपरेशनमध्ये पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)