शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा

By अझहर शेख | Updated: August 8, 2023 13:41 IST

नाशिक तालुक्यातील पाच गावांमध्ये अद्याप भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.

नाशिक : पुणे-नाशिकरेल्वेसाठी जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत सिन्नर तालुक्यातील १७ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया राबवत ४५ हेक्टर इतके क्षेत्र थेट खरेदी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये ४४५ गटांचा समावेश असून १२५ खरेदी खत नोंदविण्यात आले आहेत. नाशिक तालुक्यातील पाच गावांमध्ये अद्याप भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे भूसंपादनासह पुढील सर्वच काम मागील काही महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकला झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना या प्रकल्पाला गती देणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी मंगळवारी (दि.८) जिल्हा प्रशासनासोबत ऑनलाइन आढावा बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत विविध सूचना याबाबत दिल्या जाण्याची शक्यता आहे. हा रेल्वेमार्ग एकूण २३२ किमीचा आहे. या द्रुतगती रेल्वे मार्गासाठी काही गावांत जमिनींचे संपादनही सुरू झाले. जिरायत, हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमिनीसाठी प्रतिहेक्टरी दर प्रशासनाने जाहीर केले. राज्यात झालेल्या सत्तांतराचा फटका या प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. पवार उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांनी आता या रखडलेल्या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सिन्नर तालुक्यातील मोह ते वडझिरेपर्यंत एकूण १७ गावांचे मिळून १९७ हेक्टर खासगी क्षेत्र संपादित करावयाचे आहे. त्यापैकी केवळ ४५ हेक्टरवरील क्षेत्र थेट खरेदीने संपादित करण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित १५२हेक्टर क्षेत्रावर भूसंपादन प्रक्रिया राबवायची आहे. १२५भूधारकांना मोबदला रक्कम ५७ कोटी २६ लाख ९६ हजार इतकी देण्यात आली आहे.नाशिकच्या या गावांत भूसंपादन -नाशिक तालुक्यातील देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, संसारी, नाणेगाव या पाच गावांमध्ये एकूण १७२ गटांमधील खासगी क्षेत्राचे थेट भूसंपादन करण्यात येणार आहे. एकूण ४५ हेक्टर इतके हे क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्वाधिक १५.६८ हेक्टर क्षेत्र संसारी गावातील अधिग्रहित केले जाणार आहे. ४ गावांची संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित मौजे देवळाली गावाचे आरेखनातील क्षेत्रात बदल झाल्याने मोजणी प्रलंबित आहे.

मुंबईला उद्या होणारी बैठक रद्द -मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी (दि.९) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व अन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी दृकश्राव्य यंत्रणेद्वारे ऑनलाइन बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत. 

 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे