शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नांदूरशिंगोटे उपबाजारात ५५०० क्विंटल कांदा आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 00:02 IST

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजारात शुक्रवारी (दि. २८) कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, सरासरी १४०० रुपये भाव मिळाला.

ठळक मुद्दे100 जणांची कोरोना चाचणी ; दोन बाधित

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजारात शुक्रवारी (दि. २८) कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ५५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, सरासरी १४०० रुपये भाव मिळाला.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळून सिन्नर बाजार समितीच्या वतीने नांदूरशिंगोटे उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करण्यात आला. बाजारात प्रवेश करण्यापूर्वीच शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी, मदतनीस आणि बाजार समितीशी संबंधित १०० व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यावेळी ९८ जण निगेटिव्ह, तर दोनजण कोरोनाबाधित आढळून आले. उपचारासाठी त्यांची रवानगी दोडी बुद्रूक येथील कोविड सेंटरमध्ये करण्यात आल्याची माहिती सभापती लक्ष्मणराव शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांनी दिली.शुक्रवारी नांदूरशिंगोटे उपबाजारात ५५०० क्विंटलची आवक झाली. बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असल्याचे बघूनच प्रवेश देण्यात आला. ज्यांनी टेस्ट केलेली नाही त्यांची प्रवेशद्वारावरच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. याप्रसंगी संचालक अनिल सांगळे, विजय सानप, व्यापारी भारत मुंगसे, रवींद्र शेळके, विशाल बर्के, बाजार समितीचे उपसचिव अनिल परदेशी, राजेभोसले आदी उपस्थित होते.नियमावलीचे पालनयापुढेही कोरोनाची नियमावली पाळणे बंधनकारक राहणार आहे. लिलाव सुरू झाल्यानंतर फक्त शेतकरीच कांदा, शेतीमालाजवळ थांबेल. बाजार आवारात अनावश्यक गर्दी करू नये व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे आवश्यक राहील. शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रूक उपबाजार आवारात दुपारी ३ वाजेपर्यंतच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे उपबाजारात आवारात शेतकरी व हमाल, मापारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याप्रसंगी सभापती लक्ष्मणराव शेळके, संजय खैरनार, अनिल सांगळे, भारत मुंगसे, रवींद्र शेळके आदी.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार