शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील धरणात ५५ टक्के पाणी साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 14:29 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देऊन वाढताच कमालिची घट : टॅँकरची वाढली मागणी गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर

नाशिक : फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालिची घट सुरू झाली असून, आॅक्टोंबर अखेर सरासरी ९८ टक्के पाणी साठा असलेल्या धरणांमध्ये गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ५५ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण वाढताच पाण्याची टंचाई जाणवू लागणार असून, येवला, मालेगाव व बागलाण या तीन तालुक्यातून फेब्रुवारीतच टॅँकरची मागणी करण्यात आली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोंबर अखेर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होवून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात पाणी सोडावे लागले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येवून त्यानुसार आवर्तने सोडली जात असून, आज अखेर ३६४२३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरण समुहात ७३ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ७६ टक्के पाणी आहे. कश्यपि धरणात ९५ टक्के तर आळंदीत ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समुहातून पर जिल्ह्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ६४ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात पालखेड धरणात फक्त ४६ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६८ टक्के पाणी आहे. गिरणा खोºयातील चणकापूरमध्ये ७१ टक्के तर हरणबारीत ६० टक्के व गिरणात ३१ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षानंतर पुर्णपणे भरले होते. या धरणातील ७० पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यात करण्यात आला आहे.फेब्रुवारी अखेरपासून सिंचनासाठी असलेले आरक्षण विविध धरणातून सोडण्यात येणार असून, यापुढच्या काळात पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण ५५ टक्के पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने आरक्षणाव्यतिरीक्त शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक