जिल्ह्यात ५२२१ कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:47 IST2021-05-12T22:07:56+5:302021-05-13T00:47:11+5:30
नाशिक :कोरोना बळींची संख्या बुधवारी (दि. १२) एकूण ३५ वर गेल्याने एकूण बळींची संख्या ३९७० वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने २३६६ वर मजल मारली आहे. तर दुपटीहून अधिक एकूण ५२२१ कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात ५२२१ कोरोनामुक्त !
नाशिक :कोरोना बळींची संख्या बुधवारी (दि. १२) एकूण ३५ वर गेल्याने एकूण बळींची संख्या ३९७० वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने २३६६ वर मजल मारली आहे. तर दुपटीहून अधिक एकूण ५२२१ कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १२१७, तर नाशिक ग्रामीणला १०९७ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १५२ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २३, ग्रामीणला १२ असा एकूण ३५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. सातत्याने तीसहून अधिक मृतांची संख्या रहात असल्याने जिल्ह्यात अधिक कठोर निर्बंधांची तातडीने अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांकडूनच व्यक्त होऊ लागला आहे.
उपचारार्थी २५ हजारांवर
जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून बाधितांच्या तुलनेत कोरोना मूक्तांचा आकडा अधिक असल्याने सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या २५९६९ हजारांवर आली आहे. दत्त पंधरा दिवसात सुमारे वीस हजारांहून अधिक उपचारार्थी रुग्ण संख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुक्त ९१ टक्क्यांवर
दत्त महिन्याच्या मध्याला ८२ टक्के पर्यंत घसरलेला कोरोना मुक्त रुग्ण संख्येचा दरात पंधरा दिवसांपासून सातत्याने अल्पशी वाढ होत आहे. त्यामुळेच या टक्केवारीत नऊ टक्क्यांहून अधिक भर पडली असून महिनाभरापासून प्रथमच कोरोना मुक्तीचा दर पून्हा नव्वद टक्क्यांवर पोहोचला आहे.