शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लॉन्समध्ये ५० हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:44 IST

गंगापूररोडवरील सोमेश्वर लॉन्समधील वधू कक्षात बॅगमध्ये ठेवलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर : गंगापूररोडवरील सोमेश्वर लॉन्समधील वधू कक्षात बॅगमध्ये ठेवलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रतिभा शिंदे (५३, रा. तारवालानगर) या गंगापूर रोडवरील सोमेश्वर लॉन्स येथे लग्न सोहळ्यानिमित्त गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांनी लॉन्समधील वधू कक्षात बॅग ठेवली होती. सदर बॅगेत ५० हजार रु पये किमतीचे सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट होते. अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून बॅगेतील सदर ब्रेसलेट चोरून नेले. प्रतिभा शिंदे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गंगापूर रोडवरील असलेल्या या मोठमोठ्या लॉन्समध्ये चोरट्यांचा शिरकाव वाढल्याने उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या लॉन्स व मंगल कार्यालयेही सुरक्षित नसल्याने बुकिंगसाठी लाखो रु पयांचा खर्च वाया जाऊन असुरक्षित असल्याचेच नागरिकांमध्ये चर्चा आहे. याबाबत लॉन्सचे संचालक सुरज आहेर यांना विचारले असता लॉन्समध्ये कुठल्याही प्रकारची चोरी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.वाहनांच्या बॅट-या लंपासचेहेडी बुद्रुक येथून अज्ञात चोरट्याने तीन चारचाकी गाड्यांच्या बॅटºया चोरून नेल्या. चेहेडी बुद्रुक येथील सुनील संतू सातपुते यांच्या घराजवळ लावलेला ट्रॅक्टर (एमएच १५, बीडब्ल्यू १३६१), बोलेरो जीप व अशोक आवारे यांची मारुती व्हॅन गाडीची बॅटरी शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली.मुलीचे अपहरणनाशिकरोड रेल्वेस्थानकावर आलेल्या सातपूर येथील मुलीचे एका व्यक्तीने अपहरण केले आहे. सातपूर प्रबुद्धनगर येथील ज्योती सुधाकर गांगुर्डे या मुलीसह गुजरातहून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वेने उतरल्या. त्यानंतर एका व्यक्तीने ज्योती गांगुर्डे यांच्या मुलीचे अपहरण करून पळवून नेले.पेठरोडला युवकाची सोनसाखळी हिसकावलीपंचवटी येथील युवकाला मारहाण सुरू असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाºया युवकाला किरकोळ कारणावरून दोघा संशयितांनी बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने हिसकावून पलायन केल्याची घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत सुनील शंकरराव ढाकणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. दत्तनगर परिसरात राहणारे संशयित आरोपी आकाश काळे व अजित कापसे असे दोघेजण एका मुलाशी भांडण करत असताना फिर्यादी त्या ठिकाणी गेले व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना राग आल्याने त्यांनी दगड, विटांनी फिर्यादीला मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने चोरून नेली. त्यानंतर संशयितांनी कार मधून पलायन केले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी