शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

नाशिक उपकेंद्रासाठी  ५० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:54 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या कामकाजासाठी सुरुवातीला दहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्याचा तसेच, स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोजगारनिर्मितीसाठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या कामकाजासाठी सुरुवातीला दहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्याचा तसेच, स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोजगारनिर्मितीसाठी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) नाशिक उपकेंद्राच्या उभारणीसाठी ५० लाख आणि प्रशासकीय कामकाजासाठी ७० लाख अशा एकूण एक कोटी २० लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे.अधिसभा सभेला व्यवस्थापन परिषदेचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, विजय सोनवणे, प्रा. डॉ. नंदू पवार, मोतीराम देशमुख, कल्पना आहेर, तानाजी वाघ, दिनेश नाईक, अमित पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाशी निगडित विविध बाबींवर चर्चा झाली. त्यापैकी नाशिकच्या उपकेंद्राच्या उभारणी कार्यासाठी ५० लाख, तर प्रशासकीय बाबींसाठी ७० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी विद्यापीठातर्फे नियुक्त केलेल्या उपकेंद्र उभारणीसंदर्भात समितीने सादर केलेल्या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता देऊन हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर पुढील प्रक्रियेला गती मिळणार असून, नाशिकच्या उपकेंद्रासाठी सरकारकडून मिळालेल्या दिंडोरी तालुक्यातील सोनई येथील जागेवर कामकाजासाठी सुरुवातीला १०,००० चौरस फूट बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी (दि. २०) मंजूर केलेला ५० लाखांचा निधी आर्किटेक्ट निवड, प्रोजेक्ट मॅरेजर नियुक्तीसह अन्य विविध बाबींकरिता उपयोगात आणला जाणार असल्याने आगामी काही काळात उपकेंद्र उभारणीला चालना मिळण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल