शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पाच दुचाकी जळून खाक; गुरुद्वारा जवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 00:25 IST

सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही मात्र दुचाकी जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नाशिक : शहरातील पंचवटी भागात काट्या मारुती पोलिस चौकीच्या हद्दीतील गुरुद्वारा शेजारी असलेल्या एका सदनिकेच्या वाहन तळावर उभ्या असलेल्या दुचाकींना आग लागून पाच दुचाकी जळाल्याची घटना बुधवारी (दि.22) रात्री साडे अकरा वाजता घडली आहे. सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही मात्र दुचाकी जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेचे वृत्त कळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. सदर आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. बुधवारी रात्री गुरुद्वारा जवळ असलेल्या सीमा अपार्टमेंट सदनिकेच्या वाहन तळावर सदनिकेच्या राहणाऱ्या सदस्यांनी नेहेमीप्रमाणे दुचाकी उभ्या केलेल्या होत्या. रात्री साडे अकरा वाजता सदनिकेच्या आवारात धूर निघून काहीतरी जळाल्याचा वास येऊ लागल्याने सदस्यांनी तत्काळ खाली धाव घेतली. 

त्यावेळी दुचाकी पेटलेल्या दिसल्या नागरिकांनी तत्काळ पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकींनी वेगाने पेट घेतल्याने नागरिकांनी पंचवटी अग्निशमन दलाला माहिती कळविली त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह दाखल झाले इमारतीच्या वाहनतळात मोठा भडका उडाल्याने त्यांनी सुरुवातीला सदनिकेच्या राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले आणि त्यानंतर पेटलेल्या दुचाकीवर पाण्याचा मारा करून दुचाकींनी लागलेली आग आटोक्यात आणली या घटनेत पाच ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने दुचाकी धारकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पाच मिनिटाची जळून खाक झाल्याने सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की कोणी लावली याबाबत प्रश्नचिन्ह असून प्रचारकी जळाल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले होते घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :Nashikनाशिकfireआग