येवल्यातील ५ अहवाल पॉझीटीव्ह; ७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 02:42 IST2020-08-26T21:50:43+5:302020-08-27T02:42:25+5:30
येवला : तालुक्यातील ५ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २६) पॉझीटीव्ह आले, तर ७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

येवल्यातील ५ अहवाल पॉझीटीव्ह; ७ कोरोनामुक्त
लोकमत न्युज नेटवर्क
येवला : तालुक्यातील ५ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २६) पॉझीटीव्ह आले, तर ७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
बाधितांमध्ये मुखेड येथील ५३ वर्षीय पुरूष, पाटोदा येथील २५ व ४५ वर्षीय पुरूष, चिचोंडी येथील ४५ वर्षीय पुरूष, देशमाने येथील ७८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हे पाचही अहवाल खाजगी लॅबकडील आहेत.
तालुक्यातील बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून २ तर नगरसुल येथील डेडीकेटेड कोविह हेल्थ सेंटर मधून ५ असे एकुण ७ बाधित बुधवारी, (दि. २६) कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३२० झाली असून आजपर्यंत २५२ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ४६ असल्याची माहिती तालुका आरोग्य हितेंद्र गायकवाड यांनी दिली.