दूध बाजारात नायलॉन मांजाचे ४९ गट्टू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:28+5:302021-01-13T04:36:28+5:30
भद्रकाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दूध बाजारात सापळा रचला. या वेळी संशयित जितू दत्तात्रय भोसले (रा. तिवंधा लेन, ...

दूध बाजारात नायलॉन मांजाचे ४९ गट्टू जप्त
भद्रकाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दूध बाजारात सापळा रचला. या वेळी संशयित जितू दत्तात्रय भोसले (रा. तिवंधा लेन, भद्रकाली) हा नायलॉन मांजा विक्री करत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पर्यावरण संवर्धन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलिसांनी आतापर्यंत चार ठिकाणी धाडी टाकून सुमारे १ लाख २८ हजार रुपये किमतीचा मांजा जप्त केला आहे. तसेच मांजाविक्री करणाऱ्या संशयितांवर कारवाई केली.
भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांना दूध बाजारातील एका डेअरीच्या बाजूला संशयित भोसले हा बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून अचानक धाड टाकत संशयितास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून मोनोकाइट, गोल्ड मोनोकाइट कंपनीच्या नायलॉन मांजाचे ४९ गट्टू जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी भादंवि कलम पर्यावरण (संरक्षण कायदा) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी तपास करत आहेत.
--
फोटो आर वर १२ नायलॉन नावाने सेव्ह आहे.