मखमलाबादला ४६ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:15 IST2021-03-23T04:15:28+5:302021-03-23T04:15:28+5:30

स्वामी विवेकानंद नगर येथील वैभव लक्ष्मी रो-हाऊस क्रमांक १ येथे राहणाऱ्या भोये गेल्या मंगळवारी कामानिमित्त बाहेर गेल्या असताना, चोरट्यांनी ...

46,000 burglary in Makhmalabad | मखमलाबादला ४६ हजारांची घरफोडी

मखमलाबादला ४६ हजारांची घरफोडी

स्वामी विवेकानंद नगर येथील वैभव लक्ष्मी रो-हाऊस क्रमांक १ येथे राहणाऱ्या भोये गेल्या मंगळवारी कामानिमित्त बाहेर गेल्या असताना, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. भोये घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा व कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरात बघितले असता, घरातील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले होते. यावरून घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी म्हसरुळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

----

गणेशवाडीत रिक्षा पेटवण्याचा प्रयत्न

पंचवटी : गणेशवाडी सहजीवन नगर परिसरात रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी घरासमोर उभी असलेली रिक्षा जमिनीवर पाडून कोणता तरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहजीवन नगरला राहणारे लक्ष्मण विजय कोठेकर यांनी याविषयी तक्रार दिली आहे. कोठेकर यांनी नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर मोकळ्या जागेत उभी केलेली रिक्षा (एमएच १५ एके ५६३५) अज्ञात दोन संशयितांनी खाली पाडून ज्वलनशील पदार्थ टाकून हूड जाळून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोठेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 46,000 burglary in Makhmalabad