कृउबा निवडणुकीसाठी ४६ उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: January 16, 2016 22:42 IST2016-01-16T22:36:21+5:302016-01-16T22:42:31+5:30

मनमाड : चार माजी सभापतींची माघार

46 candidates in the fray for Krusa elections | कृउबा निवडणुकीसाठी ४६ उमेदवार रिंगणात

कृउबा निवडणुकीसाठी ४६ उमेदवार रिंगणात

मनमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या १७६ उमेदवारांपैकी आज माघारीच्या दिवसापर्यंत एकूण १३० अर्ज माघार घेण्यात आले असल्याने ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
बाजार समितीच्या राजकारणात गेल्या चार पंचवार्षिकपासून सहभागी असलेल्या प्रकाश घुगे, सतीश पाटील, राजेंद्र पवार, व्यंकट आहेर या चारही माजी सभापतींनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. यासह माजी आमदार संजय पवार व जिल्हा बॅँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. शनिवारी माघारीच्या अखेरच्या दिवशीपर्यंत १३० अर्ज मागे घेण्यात आले असल्याने १८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंंगणात आहे.
सोसायटी गटाच्या ११ जागांसाठी २५ उमेदवार, ग्रामपंचायत गटात चार जागांसाठी १३ उमेदवार, हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी सहा असे एकूण ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. (वार्ताहर)

Web Title: 46 candidates in the fray for Krusa elections