नांदगाव तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ४५३ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:09 IST2020-12-29T21:21:01+5:302020-12-30T00:09:26+5:30
नांदगाव : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) एकूण ४५३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

नांदगाव तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ४५३ अर्ज दाखल
नांदगाव : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) एकूण ४५३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
मंगळवारी दाखल झालेल्या अर्जामध्ये सोयगाव तांदुळवाडी कुसमतेल लोहशिंगवे या ठिकाणी मात्र प्रत्येकी एकाच अर्ज दाखल झालेत. तालुक्याच्या उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या गावाचा तपशील असा न्यायडोंगरी ३७, बोलठाण ३७, आमोदे २०, साकोरा १९, हिसवळ खुर्द १८, कळमदरी २२, जातेगाव २६, अस्तगांव २७, वेहेळगाव २०, वडाळी खुर्द १२, माळेगाव कर्यात १५, सटाणे ३, क-हि ५, सावरगाव ६, जळगाव बुद्रुक ७, चिंचविहीर ९, भालुर ४, गंगाधरी ९, भौरी ११, वंजारवाडी ४, वाखारी ५, पिंप्राळे ८, बाभूळवाडी ६, जवळकी ७, पिंपरी हवेली ८, परधाडी ४, चांदोरा ६, वडाळी बुद्रुक १३, एकवई २, धोटाणे बुद्रुक ६, हिंगणेदेहरे ५, मोहेगाव ११, टाकली बुद्रुक ३, पानेवाडी ११, कोंढार २, न्यू पांझण ५, गोंडेगाव ७, ढेकू खुर्द १६, माणिकपुंज २. कासारी ९ या प्रमाणे आहेत.