गारपिटीमुळे घटणार युरोपीय देशातील ४५० कोटींची द्राक्षनिर्यात
By Admin | Updated: March 15, 2015 00:15 IST2015-03-15T00:14:54+5:302015-03-15T00:15:17+5:30
गारपिटीमुळे घटणार युरोपीय देशातील ४५० कोटींची द्राक्षनिर्यात

गारपिटीमुळे घटणार युरोपीय देशातील ४५० कोटींची द्राक्षनिर्यात
नाशिक : आॅक्टोेबरपासून सातत्याने दर महिन्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्'ातील द्राक्ष निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्षनिर्यात निम्म्याने घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी मुंबई पोर्ट ट्रस्टमधून १० हजार कंटेनरची द्राक्षनिर्यात परदेशात होऊन त्यापोटी सुमारे १६०० कोटींचे परकीय चलन उपलब्ध झाले होते. त्यातील युरोप व इंग्लंड या देशांमध्ये ९७५ कोटींची द्राक्षनिर्यात करण्यात आली होती. ती गारपिटीमुळे यंदा अवघी ४५० कोटींच्या आसपास राहणार असल्याचे वृत्त आहे. नाशिकमध्ये प्रामुख्याने निफाड, दिंडोरी, चांदवड या तीन प्रमुख तालुक्यांबरोबरच सिन्नर, येवला, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव, देवळा या तालुक्यांतही कमी-अधिक प्रमाणात सर्व मिळून सुमारे एक लाख एकरवर द्राक्षलागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी मुंबई पोर्ट ट्रस्टमधून जवळपास १० हजार कंटेनर परदेशात निर्यात करण्यात येऊन त्यातून एकूण जवळपास २ लाख मेट्रिक टन द्राक्षनिर्यात करण्यात आली. त्यापोटी देशाला सुमारे १६०० कोेटी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध झाले होते. या १० हजार कंटेनरपैकी ६ हजार कंटेनर एकट्या युरोप व इंग्लंडमध्ये निर्यात करण्यात आली होती. त्यापोटी जवळपास सुमारे ९७५ कोटींचे परकीय चलन देशाला उपलब्ध झाले होते. यंदा मात्र ही कंटेनर संख्या आणि द्राक्षनिर्यात संख्या कमालीची घटणार आहे. शुक्रवारपर्यंत मुंबई पोेर्ट ट्रस्टमधून युरोप व इंग्लंड येथे सुमारे १९९२ कंटेनर द्राक्षनिर्यात करण्यात येऊन आणखी पुढील १० ते १२ दिवसांत ही संख्या २५०० हजार कंटेनरच्या घरात जाईल. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ३५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात कमी होणार असून, त्यामुळे साधारणत: ४५० ते ४७५ कोेटींचे परकीय चलन कमी होणार आहे.(प्रतिनिधी)