राज्यातील ४५ उपासकांनी घेतली श्रामणेर दीक्षा
By Admin | Updated: May 15, 2014 22:25 IST2014-05-15T00:21:51+5:302014-05-15T22:25:52+5:30
नाशिक : बुद्ध पौर्णिमेनिमित्त नालंदा एज्युकेशनल अॅण्ड सोशल ट्रस्टच्या वतीने आयोजित सहा दिवसांच्या श्रामणेर दीक्षा शिबिरात राज्यभरातील ४५ उपासकांनी सहभागी होत धम्म समजावून घेतला,

राज्यातील ४५ उपासकांनी घेतली श्रामणेर दीक्षा
नाशिक : बुद्ध पौर्णिमेनिमित्त नालंदा एज्युकेशनल अॅण्ड सोशल ट्रस्टच्या वतीने आयोजित सहा दिवसांच्या श्रामणेर दीक्षा शिबिरात राज्यभरातील ४५ उपासकांनी सहभागी होत धम्म समजावून घेतला, तसेच स्वत:पासून बौद्ध धर्माचे आचरण करण्याची शपथ घेतली़ पांडवलेणीच्या पायथ्याला असलेल्या बुद्धविहारात सुरू असलेल्या या श्रामणेर शिबिराचा बुद्ध पौर्णिमेला समारोप होत आहे़ बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या दिवसभर विविध कार्यक्रमांचे याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे़ बुद्ध स्मारकात नालंदा एज्युकेशनल अॅण्ड सोशल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रामणेर दीक्षा शिबिरात नाशिकसह परभणी, धुळे, हिंगोली, औरंगाबाद तसाच विविध ठिकाणच्या ४५ बाल व तरुण उपासकांनी सहभागी होत धम्माचा अभ्यास केला़