जिल्ह्यातील ४५ जणांना व्हायचंय क्रिकेट पंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:45+5:302021-09-24T04:16:45+5:30
सिडको : क्रिकेटची आवड असणाऱ्यांना अनेकदा क्रिकेट खेळासाठी काहीतरी योगदान देण्याची इच्छा असते. त्यातही पंच होऊन सामनाधिकारी होण्याची संधी ...

जिल्ह्यातील ४५ जणांना व्हायचंय क्रिकेट पंच
सिडको : क्रिकेटची आवड असणाऱ्यांना अनेकदा क्रिकेट खेळासाठी काहीतरी योगदान देण्याची इच्छा असते. त्यातही पंच होऊन सामनाधिकारी होण्याची संधी मिळणार असेल तर कुणालाही आवडेल. त्यामुळचे जिल्ह्यातील तब्बल ४५ जणांनी पंचांची कामगिरी आणि कर्तव्य जाणून घेण्यासाठी पंच मार्गदर्शन शिबिरात भाग घेऊन पंच होण्याची इच्छा व्यक्त केली.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एन डी सी ए) च्या वतीने आयोजित पंचांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर नुकतेच झाले.
महात्मा नगर क्रिकेट मैदान हॉल येथे शिबिर घेण्यात आले. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन वर्षभर साधारण पाचशेपेक्षा जास्ती सामन्यांचे आयोजन करीत असते. नाशिक शहरामधील विद्यमान पंच व नाशिक जिल्ह्यातील सर्व इच्छुक खेळाडू व क्रिकेटप्रेमी उमेदवारांकरिता, क्रिकेट पंच बनण्यासाठी या शिबिरात विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मूळचे नाशिकचे व सध्या बीसीसीआयचे पंच असलेले संदीप चव्हाण व नाशिकचेच एम सी ए लेव्हल वन पंच प्रणव कुलकर्णी यांनी शिबिरात मार्गदर्शन केले.
नाशिक शहर व जिल्ह्यातील सटणा, सिन्नर, ओझर, निफाड तालुक्यांसह एकुण ४५ जणांनी सहभाग नोंदवत या संधीचा लाभ घेतला. भावी काळातील पंच म्हणून भूमिका पार पाडण्यात या शिबिराचा नक्कीच चांगला उपयोग होईल अशी भावना शिबिरार्थींनी व्यक्त केली. शिबिरानंतर सर्व सहभागी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिरास नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनपाल (विनोद) शहा व सचिव समीर रकटे, विनोद यादव उपस्थित होते. प्रास्ताविक नाशिक जिल्हा क्रिकेट अम्पायर्स असोसिएशनचे सर्वेश देशमुख यांनी केले क्रिकेट पंच प्रदीप गायधनी , व्ह्यालेंटाईन मकार्डो आणि विवेक केतकर यांचा शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
230921\23nsk_40_23092021_13.jpg
फोटो ओळीं: शिबिरार्थी क्रिकेट पंच समवेत नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा समवेत समीर रकटे, संदीप चव्हाण, प्रणव कुलकर्णी ,विनोद यादव, सर्वेश देशमुख आदि.