लोकमत न्यूज नेटवर्कअभोणा : शहर परिसरात बुधवारी (दि. ५) रात्रीच्या सुमारास पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. प्रारंभी हलक्या सरीत कोसळणारा पाऊस वाऱ्यासह टपोºया थेंबांनी बरसला. अवघ्या काही वेळातच रस्ते जलमय झाले होते. तब्बल अर्ध्या तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.चणकापूर पाणलोट क्षेत्रात १२ मिमी पाऊस झाला. धरणात ६३९ दलघफू पाणी साठा आहे. पुनंद प्रकल्प क्षेत्रात ३५ मिमी पाऊस झाला तर ४६२ दलघफू पाणीसाठा आहे. दरम्यान पश्चिम आदिवासी पट्ट्यातील ओझर, बोरदैवत, देवळी, सुकापूर, पळसदर, खिराड, लिंगामा, तिºहळ या गावांसह सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.या पावसाने शहर परिसरातील मका, सोयाबीन, बाजरी आदी खरीप पिकांना चांगला फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाच्या दीर्घ दडीने भात, नागली पिके लावणीअभावी वाया गेली आहे.
अभोण्यात अर्धा तासात ४५ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:21 IST
अभोणा : शहर परिसरात बुधवारी (दि. ५) रात्रीच्या सुमारास पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. प्रारंभी हलक्या सरीत कोसळणारा पाऊस वाऱ्यासह टपोºया थेंबांनी बरसला. अवघ्या काही वेळातच रस्ते जलमय झाले होते. तब्बल अर्ध्या तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अभोण्यात अर्धा तासात ४५ मिमी पाऊस
ठळक मुद्देपावसाच्या दीर्घ दडीने भात, नागली पिके लावणीअभावी वाया गेली आहे.