४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
By Admin | Updated: July 26, 2016 01:03 IST2016-07-26T01:02:42+5:302016-07-26T01:03:14+5:30
४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
नाशिक : येत्या सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यासाठी सोमवारी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. २४ आॅगस्ट रोजी या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात येणार आहे.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पेठ तालुक्यात ३५, सुरगाणा- १, त्र्यंबक- ५ व दिंडोरी- ४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीचे नामांकन पारंपरिक पद्धतीने म्हणजेच लिखित अर्जाद्वारेच भरण्याची मुभा आयोगाने दिली असून, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आयोगाने आॅनलाइन नामांकन दाखल करण्याचा आग्रह उमेदवारांकडे धरला होता, त्यावरून मोठा गोंधळ उडाल्याने अखेर लिखित नामांकन घेण्यात आले, ते टाळण्यासाठी आयोगाने पारंपरिक पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)