४४ गाव नळपाणी योजनेचा बोजवारा !
By Admin | Updated: December 10, 2015 23:32 IST2015-12-10T23:12:13+5:302015-12-10T23:32:56+5:30
४४ गाव नळपाणी योजनेचा बोजवारा !

४४ गाव नळपाणी योजनेचा बोजवारा !
तळेगावरोही : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा दोन ते तीन दिवसांपासून संप सुरू होता. तो बुधवारी मिटल्याचे समजते; मात्र दि. २६ नोंव्हेबरपासून चांदवड तालुक्यातील काळखोडे, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, वाहेगावसाळ, नारायणखेडे ही गावे शेवटी आल्यामुळे की काय म्हणून पाणी नाही. तरी या गावांना कायमच आठ ते दहा दिवस पाणी न येण्याचा प्रकार चालू
असतो.
महिलावर्गाला डोक्यावर दुरून पाणी आणावे लागत आहे. दुष्काळाची दाहकता ही डिसेंबरमध्ये अधिक वाढलेली आहे. विहिरींनी तळ गाठला असताना घरातून निघताना प्रथम पाण्याचा विचार करून पाणी शोधण्यासाठी महिलांना जावे लागते. वाहेगावसाळ ते काळखोडे येथील पाइपलाइन ३ इंची असून, ती पाच
इंची करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. काळखोडेचा जलकुंभ हा ७५ हजार लिटरचा असून, तो पूर्ण भरण्याकरिता बारा ते तेरा तास लागतात. त्यात मागे काहीतरी अडचणी येतात व जलकुंभ भरत नाही. त्यात दोष कुणाचाच नसतो तर नागरिकांना वेठीस का धरले जाते, असा सवाल विचारला जात आहे. (वार्ताहर)