शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

४२ खेड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:59 IST

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरणातून राबविण्यात आलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना वीजबिल थकल्याने तब्बल २९ दिवस बंद होती. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर नांदगाव तालुक्यातील २६ व चांदवड तालुक्यातील १६ गावांचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

ठळक मुद्देवीजबिलाचा भरणा; पाणी समस्या दूर

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरणातून राबविण्यात आलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना वीजबिल थकल्याने तब्बल २९ दिवस बंद होती. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. १७ लाख ५१ हजार रुपये थकीत बिलापैकी ५ लाख २५ हजार रुपयांचा रोख भरणा केल्यानंतर सदर योजना पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे नांदगावचा पाणीपुरवठा पूर्ववत होऊ शकला आहे. दि. १२ जुलै रोजी योजनेचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे महावितरण कंपनीकडून बंद करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नांदगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागला. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर नांदगाव तालुक्यातील २६ व चांदवड तालुक्यातील १६ गावांचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे.धरणातून अवैध उपसापिण्याच्या पाण्याच्या योजनेची अशी परवड झालेली असताना दुसरीकडे याच धरणाचे पाणी शेती व अन्य कारणासाठी अविरत उपसण्याचे काम पंपाद्वारे सुरू होते. २० अश्वशक्तीचे सुमारे २०० पंप या कामाला जुंपले होते. यामुळे धरणातले पाणी मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बंद झाल्यानंतरही सुमारे २५ दिवस पंप सुरू होते. पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या व त्यांना साहाय्य करणाºया वीज वितरण कंपनी व जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाºयांवर याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई