नाशिकरोडला ४२ किलो कॅरिबॅग जप्त

By Admin | Updated: September 15, 2015 22:31 IST2015-09-15T22:30:21+5:302015-09-15T22:31:06+5:30

नाशिकरोडला ४२ किलो कॅरिबॅग जप्त

42 kg caribag seized in Nashik Road | नाशिकरोडला ४२ किलो कॅरिबॅग जप्त

नाशिकरोडला ४२ किलो कॅरिबॅग जप्त

नाशिकरोड : पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या ५० मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या ४२ किलो प्लास्टिकच्या कॅरिबॅग मनपा स्वच्छता विभागाच्या पथकाने परिसरातील हातगाड्यांवरील फळ विक्रेत्यांकडून जप्त केल्या.
विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली विजय मोरे, एकनाथ तारे, प्रभाकर थोरात, विजय बहेनवाल आदि मंगळवारी बिटको, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, भाजीबाजार आदि ठिकाणांहून केळी, सफरचंद, डाळींब आदि हातगाड्यांवरील विक्रेत्यांकडून ५० मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या असलेल्या प्लास्टिकच्या कॅरिबॅग जप्त केल्या. मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने जप्तीची मोहीम सुरू केल्याने व्यापारी व विक्रेत्यांमध्ये चलबिचल झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: 42 kg caribag seized in Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.