दिवाळीत रोज ४०० टन कचरा

By Admin | Updated: November 16, 2015 22:48 IST2015-11-16T22:45:40+5:302015-11-16T22:48:00+5:30

खतप्रकल्प : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक कचरा

400 tonnes of garbage every day in Diwali | दिवाळीत रोज ४०० टन कचरा

दिवाळीत रोज ४०० टन कचरा

सिडको : दिवाळीनिमित्त शहरात कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, महापालिकेच्या खतप्रकल्पावर गेल्या आठवडाभरात रोज सुमारे ४०० टनहून अधिक कचरा घंटागाड्यांमार्फत वाहून आणला जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
(दि. ११) खतप्रकल्पावर ४३९ टन कचरा आणला गेला. दरम्यान, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अजूनही ठिकठिकाणी कचरा पडून आहे.
शहरात घंटागाड्यांमार्फत दररोज सुमारे ३२५ ते ३५० टन कचरा खतप्रकल्पावर वाहून आणला जातो. शनिवार, दि. ७ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाला प्रारंभ झाला. त्यापूर्वीही दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरगुती साफसफाईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर काढला.
दीपोत्सवात नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा साचला. दि. १० नोव्हेंबरला खतप्रकल्पावर १४९ घंटागाड्यांमार्फत २९२ टन कचरा वाहून आणण्यात आला, तर दि. ११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यात तब्बल दीडशे टनांनी वाढ होऊन २०२ घंटागाड्यांमार्फत ४३९ टन कचरा संकलित करण्यात आला. दि. १२ नोव्हेंबरला पाडव्याच्या दिवशी १९४ घंटागाड्यांमार्फत ४०१ टन, तर दि. १३ नोव्हेंबरला भाऊबीजच्या दिवशीही ४०१ टन कचरा खतप्रकल्पावर आणला गेला.
शहरात अजूनही ठिकठिकाणी कचरा साचलेला असून, घंटागाड्यांमार्फत संकलनाचे काम सुरू आहे. मात्र, खतप्रकल्पावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा येत असताना खतप्रकल्प पुरेशा क्षमतेने चालविला जात नसल्याने कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 400 tonnes of garbage every day in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.