कैद्याच्या चपलेमध्ये ४०० ग्रॅम गांजा

By Admin | Updated: April 24, 2016 00:51 IST2016-04-24T00:09:01+5:302016-04-24T00:51:46+5:30

कैद्याच्या चपलेमध्ये ४०० ग्रॅम गांजा

400 gm hemp in captivity | कैद्याच्या चपलेमध्ये ४०० ग्रॅम गांजा

कैद्याच्या चपलेमध्ये ४०० ग्रॅम गांजा

 नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात भावाला देण्यासाठी आणलेल्या चप्पलमध्ये ४०० ग्रॅम लपविलेला गांजा मिळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेला कैदी नागेश भागवत सोनवणे याला त्याचा भाऊ विजय भागवत सोनवणे हा चप्पल देण्यासाठी शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजता कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आला होता. प्रवेशद्वारावरील पोलीस कर्मचाऱ्यांकडे विजय सोनवणे याने दिलेली चप्पल संशयावरून कारागृह कर्मचाऱ्यांनी तपासली असता दोन्ही चपलेच्या सोलमध्ये लपविलेला ११८० रुपयाचा ४०० ग्रॅम गांजा मिळून आला. कारागृह कर्मचाऱ्यांनी सदरील बाब आपल्या वरिष्ठांना कळवून लागलीच संशयित सोनवणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित विजय सोनवणे याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 400 gm hemp in captivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.