शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चोरून नेलेले ४० मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 01:55 IST

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील उड्डाणपुलाखाली कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या पिकअप वाहनाच्या उघड्या दरवाजातून ४० मोबाईल व चार स्मार्ट वॉच, असा सव्वादोन लाखांचा माल चोरून नेणाऱ्या संशयित शुभम दीपक कुऱ्हाडे याला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईलसह, स्मार्ट वॉचही जप्त करण्यात केले आहे.

ठळक मुद्देगुन्हे शोध पथकाची जेलरोड परिसरात सापळा रचून कारवाई

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील उड्डाणपुलाखाली कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या पिकअप वाहनाच्या उघड्या दरवाजातून ४० मोबाईल व चार स्मार्ट वॉच, असा सव्वादोन लाखांचा माल चोरून नेणाऱ्या संशयित शुभम दीपक कुऱ्हाडे याला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईलसह, स्मार्ट वॉचही जप्त करण्यात केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील उड्डाणपुलाखाली कुरिअर डिलिव्हरी करणारी पिकअप गाडी गुरुवारी उभी असताना या पिकअप वाहनाच्या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने ४० मोबाईल व चार स्मार्ट वॉच असलेला बॉक्स गुपचूप चोरून नेला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आला होता. पथकातील कर्मचारी चोरीचा तपास करीत असताना पोलीस हवालदार राजेश साबळे यांना मोबाईलचा बॉक्स चोरून नेणाऱ्या व्यक्तीची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, जयेश गांगुर्डे, अविनाश जुंद्रे, अविनाश देवरे, विशाल कुवर, महेंद्र जाधव, समाधान वाजे, अजय देशमुख, योगेश रानडे यांनी जेलरोड परिसरात सापळा रचून संशयित शुभम दीपक कुऱ्हाडे याला पकडून त्याची कसून चौकशी केली. यावेळी संशयित शुभम याच्याकडून पिकअप गाडीतून सव्वा दोन लाख रुपये किमतीचे चोरलेले ४० मोबाईल व चार स्मार्ट वॉच नाशिकरोड पोलिसांनी जप्त केले.

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक