काकासाहेबनगर येथे आगीत ४० झोपड्या खाक
By Admin | Updated: March 2, 2017 02:29 IST2017-03-02T02:29:05+5:302017-03-02T02:29:22+5:30
लासलगाव काकासाहेबनगर (रानवड) : काकासाहेबनगर येथे शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे ४० झोपड्या बेचिराख झाल्या.

काकासाहेबनगर येथे आगीत ४० झोपड्या खाक
लासलगाव काकासाहेबनगर (रानवड) : काकासाहेबनगर येथे शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे ४० झोपड्या बेचिराख झाल्या. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय इमारतीचे कामकाज सुरू असल्याने येथे मजूर वर्ग झोपड्या करून राहत आहे. रात्री शॉर्टसर्किटमुळे एका झोपडीस आग लागली, क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले. या झोपडीतील सिलिंडरचा स्फोट झाल्याने इतर झोपड्यांना आग लागली. एक-एक करत ४० झोपड्या बेचिराख झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. (वार्ताहर)