पंचवटी : परिसरातील पेठ फाटा तसेच दिंडोरीरोड याठिकाणी चालणाऱ्या मटका अड्ड्यावर पोलीस उपायुक्तांनी सोमवारी (दि.१८) सायंकाळी छापा मारून ४० जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन पंधरा हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.पंचवटीतील पेठफाटा आणि दिंडोरीरोडवर मटका अड्डा सुरू असल्याबाबत पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पंचवटी व म्हसरूळ पोलिसांच्या मदतीने सोमवारी सायंकाळी छापेमारी करीत केलेल्या कारवाईत अनेक जण मटका जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या कारवाईत दोन्ही ठिकाणाहून आकडा मटक्यावर पैसे लावून जुगार खेळणाºया एकूण ४० जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर पंचवटी पोलिसांत जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे. पंचवटी परिसरात इतरही ठिकाणी मटका जुगारप्रमाणेच रोलेट पत्त्यांचे क्लब गावठी दारू तसेच अमली पदार्थ विक्रीचे धंदे सुरू आहेत.यांसारखे अवैद्य धंदे सुरू असून, याकडे पंचवटी पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पंचवटीत चालणाºया या अवैद्य धंद्यांकडे पोलीस आयुक्त लक्ष घालतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पंचवटीत जुगार खेळणारे ४० जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:28 IST