४० फुटी रावणाचे दहन
By Admin | Updated: October 6, 2014 00:38 IST2014-10-06T00:37:43+5:302014-10-06T00:38:56+5:30
४० फुटी रावणाचे दहन

४० फुटी रावणाचे दहन
मनमाड : शहरात विजयादशमीनिमित्त दृष्ट प्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या ४० फुटी रावणाचे दहन करण्यात आले. गुरुगोविंदसिंग शाळेसमोरील स्टेडियमवर अयोजित या कार्यक्रमास शहर व परिसरातील हजारो अबालवृद्धांनी गर्दी केली होती. पंकज खताळ मित्रमंडळाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास अद्वय हिरे, राजेंद्र पवार, डॉ. सागर कोल्हे, नंदू माळी, हेमंत सोनवणे आदिंसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम, लक्ष्मण व सीतेची वेषभूषा केलेली बालके या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. निमंत्रक पंकज खताळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन बंटी गुंजाळ, दशू काल्हे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.