शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आडगावला शेतकऱ्यांना ४० पट दंडाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:22 IST

आडगाव परिसरातील शेतजमिनींचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने नाशिक तहसील कार्यालयाने परिसरातील शेतकºयांना ४० पट दंड आकारणीच्या नोटिसा बजावल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

आडगाव : आडगाव परिसरातील शेतजमिनींचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने नाशिक तहसील कार्यालयाने परिसरातील शेतकºयांना ४० पट दंड आकारणीच्या नोटिसा बजावल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेऊन दंडाची वसुली थांबविण्याच्या मागणीसाठी साकडे घातले आहे.यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतीत केलेला खर्च काढणे मुश्कील झाले असून, शेतीव्यवसाय धोकादायक झाला आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. अशा परिस्थितीत तुटपुंज्या मिळणाºया उत्पन्नावर आधारित पंक्चर दुकान, चहाची टपरी, मिसळचा गाडा, पानटपरी असे व्यवसाय सुरू केले असून, त्यातून तोकडे उत्पन्न मिळत असताना तहसीलदार यांनी सदर जागा बिनशेती नसल्याने ४० पट दंडाची आकारणी केलेल्या नोटिसा बजावल्याआहे. दंडाची कारवाई करताना शेतकºयांना क्षेत्र मोजलेले नाही. शिवाय काही लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरणे दाखल केली असून, त्याचा निर्णय अजून झालेला नाही. नोटीस प्राप्त झाल्यानंतर याबाबत विचारणा केली असता बिनशेती प्रकरणे मनपाकडे वर्ग केले असल्याचे सांगण्यात येते. याबाबत मनपाकडे विचारणा केली असता नवीन प्रकरण दाखल करा मग विचार करू अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देऊन छळवणूक केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक सुरेश खेताडे, नितीन माळोदे, पोलीस पाटील एकनाथ मते, प्रकाश शिंदे, सुरेश मते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.अस्थायी बांधकाम असल्याचा दावाशेतकºयांनी व्यवसाय सुरू केले असले तरी पक्के बांधकाम केलेले नसून ते अस्थायी स्वरूपाचे आहे. अशा परिस्थितीत ४० पट दंड आकारणी करून शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयTahasildarतहसीलदारFarmerशेतकरी